कोळशासारखे दिसते पाणी
वैज्ञानिकांनी जगातील सर्वात काळ्या नदीचा शोध लावला आहे. ही नदी आफ्रिकेतील कांगो या देशात असून याचे नाव ‘रुकी नदी’ आहे. कांगो नदीची ही उपनदी आहे. याच्या पाण्याचा रंग गडद काळा असण्यामागे पाण्यात मिसळलेले ऑर्गेनिक घटक कारणीभूत असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. ‘रुकी नदी’चे पाणी इतके काळे आहे की याच्यात तुम्ही स्वत:च्या चेहऱ्याचे प्रतिबिंबही पाहू शकत नाही. या नदीवरून ईटीएच ज्यूरिचच्या संशोधकांनी स्वत:चे अध्ययन जगासमोर सादर केले आहे. रुकी नदीचा काळा रंग तिच्या आसपासच्या रेनफॉरेस्टच्या मिसळल्या जाणाऱ्या कार्बनिक पदार्थांमुळे निर्माण झाला आहे. रुकी नदी जणू जंगलाचा चहा असल्याचे उद्गार या अध्ययनाचे प्रमुख लेखक डॉक्टर टॅव्हिस ड्रेक यांनी काढले आहेत.
पाण्याला काळा रंग का?
कांगोमध्ये स्वीत्झर्लंडच्या आकारापेक्षा चारपट मोठा ड्रेनेज बेसिन असून यात सडणारे वृक्ष आणि रोपांमुळे कार्बनयुक्त घटक निघतात, जे अतिवृष्टी आणि पावसामुळे रुकी नदीत वाहून येतात. या विरघळणाऱ्या कार्बन कंपाउंड्सचे पाण्यातील घनत्व अत्यंत अधिक असते. हे अनेक टी बॅग्सचा वापर करून चहा तयार करण्यासारखे असल्याचे डॉक्टर ड्रेक यांनी सांगितले आहे. रुकी नदी ही अमेझॉनच्या रियो नेग्रा या जगातील सर्वाधिक काळे पाणी असलेल्या नदीपेक्षा दीडपट अधिक खोल आहे. रुकी कांगो खोऱ्याचा केवळ 5 टक्के हिस्सा सामावत असली तरीही कांगोमध्ये सर्व विरघळणाऱ्या कार्बनचा पाचवा हिस्सा या उपनदीत सामावला जातो. रुकी खोऱ्याखाली मोठ्या प्रमाणात पीट बोग्स माती जमा झाली आहे. कांगो खोऱ्यातील पीट बोग्समध्ये सुमारे 29 अब्ज टन कार्बन जमा असू शकते असे संशोधकांचे मानणे आहे.