काश्मीर-हिमाचलमध्ये हिमस्खलनाचा धोका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हवामान खात्याने येत्या 24 तासांत काश्मीरमधील 8 आणि हिमाचल प्रदेशातील 4 जिल्हय़ांमध्ये हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने डोडा, किश्तवाड, पूंछ, रामबन, बांदीपोर आणि कुपवाडा जिह्यांमध्ये मध्यम धोक्मयाच्या पातळीचे हिमस्खलन आणि बारामुल्ला आणि गंदरबल जिह्यात कमी धोक्मयाच्या पातळीचे हिमस्खलन होण्याची शक्मयता वर्तवली आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काश्मीरसोबतच हिमाचल प्रदेशातील चार जिह्यांमध्येही धोक्मयाची शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे. स्नो अँड ऍव्हलांच स्टडी एस्टॅब्लिशमेंट (एसएएसई) मनालीने जारी केलेल्या इशाऱयानुसार कुल्लू, लाहौल स्पीती, चंबा आणि किन्नौर जिह्यांत हिमस्खलनाच्या घटना घडू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या धोक्यामुळे वाहनचालक, पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.