आंबोली : वार्ताहर
गोवा पर्वरी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीचा खून करून प्रेयसीचा मृतदेह आंबोली घाटात टाकला असे समोर येतेय .आंबोली पोलीसांनी पर्वरी पोलीसांशी संपर्क केला असून पोलीस आरोपीला घेऊन आंबोलीत येत आहेत अशी माहिती समोर येतेय . गोव्यातील ३० वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता होती . तिचा खून करून आंबोलीत फेकल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे .