वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बर्मिंगहॅम क्लासिक महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या केटी बोल्टरचे आव्हान पहिल्याच फेरीत पराभूत समाप्त झाले. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या ब्युरेगी, नोसकोव्हा आणि कोस्ट्यूक यांनाही पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
दोन दिवसापूर्वी नॉटिंगहॅम खुली टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रिटनच्या केटी बोल्टरला चीनच्या लिन झू हिने 7-5, 7-5 असे पराभूत करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या एका सामन्यात ब्रिटनच्या हॅरेट डर्टने आपल्याच देशाच्या ब्युरेगीचा 4-6, 6-2, 7-5, लॅटवियाच्या ओस्टापेंकोने नोसकोव्हाचा 6-2, 5-7, 6-1, रशियाच्या पोटोपोव्हाने युक्रेनच्या कोस्ट्यूकचा 6-7(6-8), 7-5, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेत आठवी मानांकित सिरेस्पी आणि मॅकडेलिना यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.