मालवण / प्रतिनिधी
श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण हे बालकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यातच नवोपक्रम म्हणून बुकमार्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बालकांना वाचनाची आवड लागावी, त्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी यासाठी हे वाचनालय सतत प्रयत्नशील असते. बुकमार्क म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही पुस्तकांच्या आतील बाजूस जोडता किंवा बंद करण्यापूर्वी तुम्ही कुठे होता हे लक्षात ठेवण्यास मदत होते. अशी ही उपयोगी वस्तू वेगवेगळ्या आकारात शिकवण्यात आली. ही कार्यशाळा मंगळवार दि २ मे २०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वेळेत श्री. चंद्रशेखर कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.