खून प्रकरणी पतीसह दोन संशयित अटकेत
रत्नागिरी : माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या अटक केली आहे. १ सप्टेंबर रोजी या तिघांनी स्वप्नाली यांना जाळून मारल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
गेले अनेक दिवस माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत होते. अखेर शहर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणी ३ जणांना आज सकाळी अटक केली आहे. गेले अनेक दिवस त्यांच्यामध्ये वादावादी होत होती. त्यांचे एकमेकांचे फार पटत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.