Union Budget 2023 Live Update : यंदा 2023-2024 चा अर्थसंकल्प सकाळी ठीक 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केलीय. गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये 75 वर्षाचा आढावा घेतला होता. भारत जेव्हा शंभरी गाढेल तेव्हा विकासाच्या कोणत्या टप्प्यावर पोहचाय़चे आहे याची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून उभी आहे. नुसती उभी नाही तर ज्या पध्दतीची पाऊले आपण उचलली आहेत त्यामुळे आपले भविष्य़ सुध्दा आपल्याला उज्वल दिसतयं. स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षात जगाने भारताची ताकद मान्य केली असेही त्या म्हणाल्या.
जागतिक मंचावर भारताचे महत्व वाढत आहे. यूपीआय, कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्त्व मान्य केलं. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरीकांची काळजी घेतली होती. रात्री कोणीही उपाशी झोपू नये याची खबरदारी घेतली होती.जानेवारी 2023 मध्ये केंद्र सरकारने ‘अंत्य़ोदय’ ही नवीन योजना सुरु केली. यामुळे शेवटच्या माणसापर्यंत अन्न पोहचण्यास मदत झाली. जगात मंदी असताना आपल्याला जी 20 आयोजनाचा मान मिळाला. जी-20 चं अध्यक्षपद मिळणॆ भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. याच्यामुळे जगाच्या पटलावर आपण कोणत्या पध्दतीने काम करू शकतो हे दाखवू शकतो.पोहचवू शकतो यासाठी ही एक मोठी संधी मिळाली. मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या काळात विविध लोकोपयोगी योजनेमुळे आपली अर्थ व्यवस्था जगातल्या 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे.
सस्टेन डेव्हलपमेंन्टमध्ये आपण खूप मोठा पल्ला गाढला आहे.केंद्र सरकारने सर्व योजना शेवटच्या नागरीकापर्यंत पोहचवल्या यामुळे सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. 102 कोटी लोकांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने काम केले आहे. शेतकऱ्यांच्या बॅंकेत थेट निधी जमा करणे ही योजनाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात अपेक्षित रक्कम पोहचली.नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.सर्वांगीण विकासाचे स्वप्न जे आपण पुढे घेऊन चाललो आहोत त्यात तिन महत्वाचे बिंदू आहेत. यामध्य़े युवकांना संधी, बेरोजगारी कमी करण्य़ाच्या दृष्टीने बॅगराऊंड तयार करणे आणि खालच्य़ा स्तरापर्यंत योजनांचा लाभ मिळवून देणं हे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचा बचत गटाच्या माध्ययमातून विकास करण्यासाठी 81 लाख बचत गटांवर लक्ष केंद्रात केलं जाणार आहे. देशातील कारागीर भारताचे चित्र खऱ्या अर्थाने जगासमोर मांडत असतात.त्यांच्यासाठी एक मनीव योजना केंद्र सरकार जाहीर करत आहे.त्यामध्ये ओबासींचा देखील समावेश करण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष देणार-सीतारमण
भारताता पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मोठ्या योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. यामध्ये विविध राज्यांचा सहभाग घेऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांच्या सहभागाचे प्रयत्न केला जाणार आहे. पर्यावरण पूरक विकास याकडे केंद्र सरकारच लक्ष असणार आहे. यातून नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 8 वेगवेगळ्या गोष्टींवर सरकार काम करणार आहे. त्यामध्ये सर्वांगीण विकास हे ध्येय आहे. मागासवर्गीय, ओबासी महिलांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार.देशातील सात पर्यटन क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. सबका साथ, सबका विकास या तत्वाने पुढे जाऊयात.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटर्फाम उभारणार. कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत करणार.
कापसापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार. डाळींसाठी ग्लोबल हब तयार केलं जाणार आहे. श्रीअन्नावर देखील विशेष लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.त्यावर जास्त भर दिला जाणार आहे. पारंपारिक पध्दतीने आपल्या अन्नाचा हे भाग आहे. ते जगभर लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी हैदराबादला ‘श्रीअन्न’ मोठ रिसर्च सेंटर होणार. यासाठी विशेष अनुदान देण्यात येणार आहे.अन्नधान्यांच्या उत्पन्नावाढीसाठी कसून प्रयत्न करणार.
पंतप्रधान मत्ससंपदा विकास योजना जाहीर
मासेमारीला फायदा होणार आहे. कारण ही योजना सहा हजार कोटींची असणार आहे. मत्स विकासासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य
ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना टेक्निकली स्टॅांग होण्यासाठी मोठी योजना जाहीर करण्यात येणार आहे.येत्या पाच वर्षाच्या काळात केंद्र सरकार छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार. ज्यामुळे त्या-त्या भागातील कृषीपूरक उद्योगाला मदत होईल.अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार.कृषीपूरक स्टार्टअप्सना विषेष मदत करणार.
वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन
वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन
157 नर्सिंग महाविद्यालयं सुरु करणार
सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजल रिसर्चसाठी प्रोत्साहन देणायत येईल.
यातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि 0 ते 40 गटातील लोकांच्या हेल्थच्या स्क्रीनिंगची व्यवस्था केली जाईल.देशातील विविध क्षेत्रे आहेत त्याला अभ्यासाला आणि रिसर्चला प्रोत्साहन देणार आहोत. यात मेडिकल वौ
मेडिकल कॉलेमध्ये लॅब उभारणीला प्रोत्साहन
वैद्यकीय उपकरणं बनवण्याला प्राधान्य
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध योजना राबवणार
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध योजना राबवणार
शिक्षकांना प्रशिक्षण देऊन आणखी कुशल बनवणार
शाळकरी मुलांसाठी डिजिटल ग्रंथालय योजणा राबवणार
नॅशनल बुक ट्रस्टमधून मुलांना विविध पुस्तक वापरता येणार
पूर्वेकडी राज्यांच्या विकासासाठी विशेष भर
शिक्षणासोबतच अवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध होणार
येत्या तीन वर्षात 38 हजार 800 शिक्षकांची नियुक्ती सरकार करणार
आदिवासी लोकांसाठी नवी योजन
आदिवासी विकासासाठी विशेष प्रयत्न करणार
आदिवासींच्या विकासाठी पुढील तीन वर्षांचा रोडमॅप तयार केला जाणार
एकलव्य शाळांच्या माध्यमातून साडे तीन लाखांहून अधिक मुलांनी शिक्षण दिलं जाणार
शिक्षकांची नियुक्ती आदिवासी विकास मिशनअंतर्गत होणार
कर्नाटकातील अप्पर भद्रा प्रोजेक्टसाठी 5, 300 कोटींची तरतूद करण्यात येतेयं.पिण्याचं पाणी आणि वापरासाठी पाण्याची ही योजना आहे.
पंतप्रधान योजनेला 66 टक्यांनी वाढ करण्यात आलीय.
हस्तलिखीतांसाठी नविन योजना जाहीर होणार. 1 लाख हस्तलिखीत जतन होणार.
गटारांच्या सफाईसाठी तांत्रिक जोड देणार.
Next Article 81 लाख महिला बचतगटांचे होणार सबलीकरण
Archana Banage
Archana Bange, a seasoned journalist with four years of experience, has made a notable impact in the field of journalism. She pursued her journalism studies at Shivaji University, Kolhapur, and began her career at Daily Sakal. Currently, Archana is a valued member of the Dainik Tarun Bharat group, where she focuses on reporting local news from the districts of Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, and Ratnagiri in Western Maharashtra. Her expertise extends to various topics, including politics, breaking news, food, lifestyle, tourism, blogs, health, web stories, and captivating human interest stories.
Related Posts
Add A Comment