नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी निवड समितीने भारतीय संघाची सोमवारी सायंकाळी उशिरा घोषणा केली असून रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले गेले आहे. आशिया चषक स्पर्धा दि. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाणार आहे. स्पर्धेत 6 संघांचा समावेश असून भारतीय संघ 7 जेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ ठरत आला आहे. बुमराह व हर्षल पटेल दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर राखीव खेळाडू असतील.
आशिया चषकासाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.