मृतदेह गोणीत भरून दिला होता पऱ्यात फेकून; रत्नागिरी शहरापासून 65 कि.मी.वर नेला मृतदेह; मुंबईतील
रत्नागिरी प्रतिनिधी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी यांचा खून केल्यानंतर संशयितांनी मृतदेह गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्यामध्ये फेकून दिल़ा. कोठारी यांचा मृतदेह टाकण्यासाठी आबलोली येथील पऱ्याची निवड का करण्यात आली, जंगलमय भागात असलेल्या या पऱ्याबाबत संशयितांना माहिती कशी मिळाली, या भागात संशयितांनी फिरून रेकी केली होती का? नेमके आबलोली पऱ्याशी संशयिताचे कनेक्शन काय आहे, आदींचा उलघडा लवकरच पोलिसांकडून करण्यात येणार आह़े.
रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा 19 सप्टेंबर रोजी शहरातील त्रिमूर्ती ज्वलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होत़ा. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आह़े या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आह़े.
किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीत भरल़ा यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात कोठारी यांचा मृतदेह असलेली गोणी ठेवण्यात आल़ी. यानंतर रिक्षातून मृतदेह मिरजोळे पाटीलवाडी-करबुडे फाटा-भातगांवमार्गे गुहागर तालुक्यातील आबलोलीत नेण्यात आल़ा. आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्यात गोणीत भरलेला किर्तीकुमार यांचा मृतदेह संशयित आरोपींनी फेकून दिल़ा. यानंतर संशयित आरोपी हे पुन्हा रत्नागिरी येथे दाखल झाले होत़े.
कोठारी यांच्या खूनामध्ये अटक करण्यात आलेले तीनही संशयित हे रत्नागिरीत वास्तव्य करतात़ मृतदेह टाकण्यासाठी त्यांनी गुहागर तालुक्यातील आबलोली येथील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्या ची निवड केल़ी. रात्रीच्या सुमारास मृतदेह ऐवढ्या लांब नेताना पकडले जाण्याचा धोका होवू शकत़ो. त्याचपमाणे करबुडे फाटा सोडल्यानंतर तिवराड येथे पोलिसांची चौकी आह़े. या ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणारी रिक्षा पोलिसांच्या नजरेत येवू शकत़े. ही सर्व माहिती असतानाही संशयितांनी रत्नागिरी शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी मृतदेह का टाकला, आदी प्रश्नांची उकल पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
संशयित आरोपी यांनी कोठारी यांचा खून करण्याचा प्लॅन यापूर्वीच तयार केला होता, असे पोलीस तपासात समोर आले आह़े. दुकानामध्ये खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याचीही तयारी संशयितांनी केली असण्याची शक्यता आह़े संशयित आरोपींपैकी कुणाचे या ठिकाणी कनेक्शन आहे का? कोठारी यांचा खून करण्यापूर्वी संशयित या ठिकाणी गेले होते का, संशयितांना या परिसरात कोणी पाहिले होते का? या बाबत पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े.