हॉलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री
हॉलिवूड अभिनेत्री कॅमरुन डिएजने स्वतःच्या कारकीर्दीवरून चकित करणारा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे. अभिनेत्री आता एका चित्रपटाचे चित्रिकरण संपविल्यावर अभिनय करणे थांबविणार आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
स्वतःच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कुटुंबाला वेळ देता येत नसल्याने अभिनेत्रीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅमरून सध्या बॅक इन ऍक्शन चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. याचे चित्रिकरण लंडनमध्ये सुरू आहे. डिएजने या चित्रपटानंतर हॉलिवूडमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कामामुळे सेटवर तिला दीर्घकाळ घालवावा लागतो. यामुळे तिला पती बेंजी मॅडेन आणि मुलगी रेडिक्सपासून दूर रहावे लागते.
अभिनेत्रीला अनेकदा सलग 10-10 तासांपर्यंत काम करावे लागते आणि यामुळे तिला स्वतःच्या मुलीला वेळ देता येत नाही. माझ्या कारकीर्दीपेक्षा एका आईचे कर्तव्य महत्त्वाचे आहे. याचमुळे अधिकाधिक वेळ स्वतःच्या कुटुंबासोबत घालवता यावा अशी माझी इच्छा असल्याचे कॅमरूनने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
अभिनेत्री सेटवर होणार ड्रामा आणि अन्य गोष्टींना वैतागून गेली आहे. हॉलिवूडला स्वतःचा बराच वेळ देत तिने स्वतःला सिद्ध केले असल्याचे कॅमरूनच्या निकटवर्तीयाने सांगितले आहे. यापूर्वीही कॅमरूनने हॉलिवूडचा निरोप घेतला होता. परंतु एका मित्राने समजूत काढल्यावर तिने 2018 साली पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती.