टोरंटो
अमेरिकेच्या व्हाइट हाउसने संघीय यंत्रणांना सर्व शासकीय उपकरणांवरील चिनी ऍप टिकटॉक हटविण्यास 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर कॅनडा सरकारनेही टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. हा ऍप खासगीत्वासाठी धोकादायक असल्याचे कॅनडा सरकारने म्हटले आहे. गोपनीयतेची सुरक्षा आणि डाटासंबंधी चिंता पाहता कॅनडाने ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडातील युजर्स आता या ऍपला डाउनलोड करू शकणार नाहीत.