ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (economic offence wing) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. मोहित यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी योग्य वापर केला नाही. त्यामुळे कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेनं भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कंबोज यांच्या कंपनीनं २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, त्यानंतर ते कर्ज बुडवल्याचाही ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला होता.
कंबोज यांनी घेतलेले कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून हे आरोप फेटाळले आहेत.
कोर्टात कायदेशीर लढा देईन…
मोहित कंबोज म्हणाले की, “मला कळालं की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही.. हे नवाब मलिकांचे(navab malik) काम असेल किंवा संजय राऊतांचे (sanjay raut) काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही”, सं म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.