उचगाव,वार्ताहर –
Kolhapur News : उचगाव ता.करवीर येथील लोकनियुक्त सरपंच मधुकर नामदेव चव्हाण यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने छाननी करून वैध ठरविला आहे. याबाबत लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.
करवीर तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या उचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली.उचगाव सरपंच पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास असे होते.आमदार सतेज पाटील गटाचे पै.मधुकर चव्हाण यांनी लोकनियुक्त सरपंच पदांची सार्वत्रिक निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून लढवली व त्यामध्ये ते विजयी झाले होते.
यावेळी सरपंच पदाचे विरोधी उमेदवार सतीश बाळकृष्ण मर्दाने तसेच सुभाष गणपती यादव यांनी जात पडताळणी समितीकडे मधुकर चव्हाण यांच्या जातीच्या दाखल्याविषयी तक्रार दाखल केली होती.त्या अर्जाची गावांमध्ये येऊन जात पडताळणी समितीने वंशावळी व इतर कागदपत्रांची चौकशी करून सदरचा दाखला वैध ठरविला आहे.सरपंच चव्हाण यांच्यावतीने ॲड.सासवडे यांनी काम पाहिले.
दरम्यान, दाखल्याची प्रत व जात पडताळणी समितीचा निकाल लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे सादर केला.यावेळी माजी सरपंच गणेश काळे,उपसरपंच विराग करी,महेश जाधव, दिनकर पोवार,आनंद यादव, अरविंद शिंदे,गुरू माने,सुरज पाटील,राहुल मोळे,श्रीधर कदम,तुषार पाटील,शामराव यादव,संदीप पाटील,विनायक हावळ,मधुकर रंगराव चव्हाण,सुमित मोरे,महेश खांडेकर व मान्यवर उपस्थित होते.या निकालाबाबत संपूर्ण करवीर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.