प्रतिनिधी/वाळपई
गोव्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया होंडा सत्तरी येथील आजोबा देवस्थानचा 13 वा वर्धापन दिन सोहळा आजपासून मोठय़ा दिमाखात सुरुवात करण्यात आला. सकाळपासून देवदर्शनाचा लाभ घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात भाविकांची उपस्थिती लागली होती. देवाच्या प्रांगणामध्ये चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाई केल्यामुळे सदर देवस्थानाला आगळेवेगळे रूप प्राप्त झालेले आहे.
श्री देव आजोबाची मूर्ती फुलांनी सजविले असून येणाऱया चार दिवसात मोठय़ा प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की होंडा आजोबा देवस्थान हे गोमंतकातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या देवस्थानाच्या माध्यमातून भागातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून देवस्थान समिती आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. या भागामध्ये महिलांना व तरुणांना वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये विकासाच्या प्रवाहात सामील करण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थान समितीतर्फे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असतात. गेल्या 13 वर्षापासून देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत असतो .यंदाही चार दिवस वेगवेगळय़ा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याची सुरुवात आजपासून करण्यात आली. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम व संध्याकाळी पारंपरिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वर्धापन दिनाच्या सोहळय़ाला आगळेवेगळे रूप प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थान परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून विद्युतरोषणाईमुळे देवस्थानाला ही वेगळय़ा प्रकारचे सर्व प्राप्त झालेले आहे.
आयोजन समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱया चार दिवसात प्रचंड प्रमाणात भाविक या सोहळय़ामध्ये सहभागी होणार असून देवदर्शनाचा लाभ घेणार आहेत. त्याचप्रमाणे देवस्थानचा उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळय़ा कार्यक्रमांमध्ये भाविक व नागरिक मोठय़ा प्रमाणात भाग घेणार असल्याचे देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.