नवी दिल्ली : चायनीज ब्रँड पोको यांनी भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने सी आवृत्तीमध्ये याचे सादरीकरण केले आहे. पोको सी 50 मध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून यासोबतच 6.52 इंच असणारा डिस्प्ले मिळणार आहे. हा स्मार्टफोन रॉयल ब्लू व कंट्री ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
अन्य सुविधा…
- 2जीबी रॅम तसेच 32 जीबी स्टोरेज
- किंमत 6,999 रुपये
- 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 7,299 रुपये
- पोको सी50 हा 10 जानेवारीपासून ऑनलाईन शॉपिंगवर उपलब्ध होणार
- 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी