तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा निर्णय : विशेष कौशल्याचे प्रशिक्षणप्राप्त
वृत्तसंस्था / चेन्नई
निळ्या रंगाचा सफारी सूट, हातात एके-47 आणि एक्स-95 सबमशीन अशाप्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त 9 महिला बॉडीगार्ड्सचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे व्हायरल छायाचित्र एखाद्या चित्रपट किंवा वेबसीरिजमधील नाही, तर या सर्व महिला बॉडीगार्ड्स तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या मुख्य सुरक्षा पथकात सामील आहेत.
स्टॅलिन यांच्यापूर्वी अनेक नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींनी स्वत:च्या सुरक्षेसाठी महिलांवर विश्वास ठेवला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड पॅमेरून, डचेस ऑफ पॅम्ब्रिज केट मिडलटन, मेगन मर्केल, पॉप गायिका बियान्सेच्या सुरक्षेत महिला बॉडीगार्ड्स सामील आहेत.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुख्य सुरक्षा पथकात सामील होण्यासाठी 80 हून अधिक उमेदवारांनी अर्ज केला होता, यातील 9 महिला बॉडीगार्ड्सना निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत उपनिरीक्षक एम. तनुश कन्नकी, हेड कॉन्स्टेबल एम. दिलशथ बेगम, कॉन्स्टेबल आर. विद्या, जे. सुमति, एम. कालीश्वरी, के. पवित्रा, जी. रामी, व्ही. मोनिशा आणि के. कौशल्या यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व महिला सुरक्षारक्षक अनआर्म्ड कॉम्बॅट, फायरिंग गन्स, बॉम्ब डिटेक्शन, गर्दीला हाताळणे, कार-बाइक चालविण्यासह स्ट्रेस, टाइम आणि फायनान्स मॅनेजमेंट करण्यात प्रशिक्षित आहेत.
कोअर टीमसाठी निवडले जाण्यापूर्वी या महिलांना अवघड शारीरिक आणि मानसिक परीक्षणाला तोंड द्यावे लागले. त्यांचे निरीक्षण कौशल्य अन् कुशाग्रपणा पाहिला गेला. एका मिनिटात येणारी कार, त्यातील लोकांची संख्या आणि भोवतालच्या प्रत्येक गोष्टीची ओळख पटविण्याची चाचणी त्यांना द्यावी लागली. या सर्व महिला बॉडीगार्ड्स सध्या दररोज सकाळी 6 वाजल्यापासून मऊधम कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.