तिसऱ्या वर्षांपासूनच तबला वादन
बेळगाव : स्वरमल्हार फौंडेशनतर्फे शनिवार दि. 10 जून रोजी सायंकाळी 5.30 वा. अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात शास्त्राrय गायन व वादनाची मैफल होणार आहे. यामध्ये अनुराग पोतदार रायबाग यांचे स्वतंत्र तबला वादन व नयन यावगल बेंगळूर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. यांना सारंग कुलकर्णी व अंगद देसाई साथ करणार आहेत.
नयन यावगल – ख्यातनाम तबला वादक पं. रवींद्र यावगल यांचे चिरंजीव नयन यावगल यांना संगीताचे बाळकडू घरातूनच प्राप्त झाले असून वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच तबला वादनाचे शिक्षण सुरू आहे. गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण रघुपती हेगडे यांच्याकडून घेतले व सध्या सुप्रसिद्ध गायक पं. परमेश्वर हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यास सुरू आहे. त्यांना केंद्र सरकारची सीसीआरटीची गायनातील शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. बी. कॉम. पदवी आणि संगीत विषयातील एम. ए. पदवी प्राप्त नयन यांना ‘रंग प्रपंच नॅशनल अवॉर्ड’ तसेच गुरु कुमार ट्रस्टचे ‘व्होकॅलिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अनुराग पोतदार, रायबाग – युवा तबलावादक कुमार अनुराग याला तबला वादनाचे शिक्षण प्रख्यात तबलावादक पंडित कल्याण देशपांडे यांच्याकडून मिळत असून, सध्या बेळगाव येथे बीबीए पदवीचे शिक्षण घेत आहे.