गेले काही दिवस सुरु असलेल्या राज्यातील नाट्य़ाला अखेर विराम मिळाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे जाहीर करून राजकीय बॉंब फोडला. दरम्यान संध्याकाळी राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
शपथविधी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरुण आपल्या पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर शिंदे समर्थकांनी राज्यभरात विशेषता: ठाण्यात फटाके फोडून आनंद साजरा केला. ढोलताशांच्या वादात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हा बाळासाहेबांच्या विचाराचा आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Previous Articleभाजपचा नवा राजकीय धक्का; देवेंद्र फडणवीस होणार आता उपमुख्यमंत्री
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.