नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीएनजीच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर 8 ऑक्टोबरपासून म्हणजेच शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. ‘आयजीएल’ने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 3 रुपयांची वाढ करण्याबरोबरच पीएनजीचे दरही 3 रुपयांनी वाढवले आहेत. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत प्रतिकिलो सीएनजीची किंमत 75.61 रुपयांवरून 78.61 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 78.17 रुपयांवरून 81.17 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे 8 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्मयता तज्ञ व्यक्त करत आहेत.
सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे रिक्षांसह ओला-उबेर सारख्या टॅक्सी सेवा देखील जास्त प्रवासी भाडे आकारण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. मागील अनेक दिवसांपासून महागाई मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अशातच आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. सध्या नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. अशा स्थितीत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून आधीच वर्तवला जात होता. नव्या दरवाढीनंतर गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत 86.94 रुपये, रेवारीमध्ये 89.07 रुपये, कर्नालमध्ये 87.27 रुपये, मुझफ्फरनगरमध्ये 85.84 रुपये आणि कानपूरमध्ये 89.81 रुपये झाली आहे.