प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सर्व लोकसेवा फौंडेशनच्यावतीने बसवन कुडची येथे शनिवारी हिंदू देवदेवतांच्या भग्न व जीर्ण प्रतिमा जमविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मंदिर जीर्णोद्धाराच्यावेळी जमलेली सहा पोती प्रतिमा कार्यकर्त्यांनी गोळा केल्या.
फौंडेशनचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ, निलकंठ शास्त्राr हिरेमठ, आप्पाण्णा चौगुला, बसवराज हन्नीकेरी, बसवंत पाटील, गुणवंत पुजेरी आदींनी या उपक्रमात भाग घेतला. बसवन कुडची येथील श्री कलमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे मंदिरातील जुन्या प्रतिमांचे काय करायचे? हा प्रश्न पडला होता.
निलकंठ शास्त्राr यांनी विरेश हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून या संबंधीची माहिती दिली. शनिवारी मंदिरातील सुमारे सहा पोती भग्न व जीर्ण प्रतिमा गोळा करण्यात आल्या. 1934 पासूनच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.