प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यावर प्रादेशिक आयुक्तपदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. शनिवारी रात्री राज्य सरकारने यासंबंधी आदेश जारी केला आहे.
नितेश पाटील हे 2012 आयएएस बॅचचे अधिकारी असून सध्या बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून ते सेवा बजावत आहेत. त्यांच्याकडे आता प्रादेशिक आयुक्त पदाचाही भार सोपविण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे.