मेष
या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या मदतीची आवश्यकता असेल. कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा दबाव वाढू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना किंवा नवीन व्यवसाय सुऊ करण्याची इच्छा असलेल्यांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. मित्र-मैत्रिणींबरोबर जास्त वेळ काढणे महागात पडू शकते. कौटुंबिक गरजांकडे लक्ष देणे भाग पडेल.
आपले जुने वस्त्र गरजूला द्यावे
वृषभ
हरप्रकारे सावध राहणे गरजेचे असेल. जवळचे मित्र किंवा नातेवाईक दगा देऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे व्यवहार करत असताना लेखी करार केल्याशिवाय करू नका. तब्येतीची, विशेषत: हाडांची काळजी घेणे आवश्यक ठरेल. व्यावसायिक निर्णय यशस्वी ठरतील. प्रेम प्रसंगांमध्ये आनंद असेल. स्वत:करता वेळ काढावा असे वाटेल. दूरच्या ठिकाणाला भेट द्याल.
हिना अत्तर लावावे
मिथुन
नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि यामुळे पुढे जाऊन फायदा होईल. या आठवड्यात आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. मनाप्रमाणे काम होण्याकरता दुसर्याची मदत घ्यावी लागेल आणि त्यात काहीही गैर नसेल. सहकार्यांशी आदराने व्यवहार करा. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा.
कुंभाराच्या चाकावरची माती घरी ठेवावी
कर्क
हा आठवडा तुम्ही कामाच्या व्यापामुळे व्यस्त असाल. व्यवसायिक जबाबदारी निभावताना वेळ पुरणार नाही. दिलेला शब्द पाळावा लागेल त्यामुळे वचन देताना विचारपूर्वक द्या. ओळखीमुळे नवीन कामे मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण समाधान कारक असेल. प्रेमींनी जबाबदारीची जाणीव ठेवावी. वैवाहिक जोडीदाराला पुरेसा वेळ देणे गरजेचे असेल.
पिंपळाच्या झाडाला हिरवे सुत बांधावे
सिंह
तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. ओळखीमुळे आर्थिक लाभ संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कौटुंबिक जबाबदारी मध्ये वाढ होईल. अनाठाई खर्च होऊ शकतो. एखाद्या समारंभाचे आमंत्रण मिळेल. विद्युत उपकरणे हाताळताना किंवा गाडी चालवताना सावध राहणे आवश्यक आहे.
मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खाऊ घालावी
कन्या
वेळेचे भान ठेवणे गरजेचे असेल. त्यामुळे कामे पूर्ण होतील. एखाद्या जुन्या आजारातून मुक्तता मिळू शकते. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्यांच्यासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी खर्च कराल. अचानक घडलेल्या काही घटनांमुळे व्यवसायिक संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो आणि त्यामुळे नुकसान संभवते. भागीदारीत व्यवसाय असेल तर वाद-विवादां पासून दूर रहा. प्रेमींनी भावनांची कदर करावी.
लाजाळूचे झाड घरी लावावे.
तूळ
कामांच्या बाबतीमध्ये गोंधळ उडेल. कोणते काम पहिल्यांदा पूर्ण करावे हे कळणार नाही. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. या आठवड्यात एकटेपणा जाणवू शकतो. तुमचा मुद्दा बरोबर असून सुद्धा काही ठिकाणी माघार घ्यावी लागू शकते. नात्यांमध्ये तडजोडीची भूमिका घ्यावी. वाद टळतील. आर्थिक आवक थोडी मंदावू शकते पण पुढे येणारा काळ हा उत्तम असेल.
पांढऱ्या रंगाचा धागा गळ्यात बांधावा
वृश्चिक
काही ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न असेल पण त्यात तुम्ही यशस्वी व्हालच असे सांगता येणार नाही. वर्तणूक नम्रतेची ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीमध्ये समाधान कारक आठवडा असेल. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणामुळे ताण तणाव येऊ शकतो. विषम परिस्थितीला योग्य रीतीने हाताळाल. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. पित्यासमान व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
मुंग्यांना साखर घालावी
धनु
हात घालाल तिथे यश मिळू शकते. प्रयत्नांची कास सोडू नये .नवीन सुऊवात दिसेल त्याकरता मानसिक तयारी ठेवावी असा टॅरो चा संदेश आहे. कामांचा उरक वाढवावा लागेल. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला सामोरे जावे लागेल. काही जवळच्या नात्यांमध्ये गैरसमजामूळे दुरावा येऊ शकतो. अति विश्वास घातक ठरेल. आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल.
कडुलिंबाच्या झाडाला पाणी घालावे
मकर
सामाजिक क्षेत्रामध्ये वावर वाढेल. लोकांचे प्रŽ सोडवताना स्वत:करता सुद्धा वेळ काढावा लागेल. आर्थिक व्यवहारात फसगत होऊ शकते. तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. कामाच्या पद्धती मध्ये थोडा बदल करावा लागेल. प्रेमींनी अपेक्षांना आवर घालावा. नात्यांमध्ये प्रेम वाढेल.
विहिरीमध्ये दोन चमचे दूध टाकावे
कुंभ
करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी साधारण परिस्थिती होऊ शकते. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत मुळे चुका होऊ शकतात. आतापर्यंत वाद झाला नाही अशा व्यक्तीशी वाद संभवतात. नात्यांमध्ये मिठास टिकवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. आर्थिक आवक चांगली असेल.
पक्षांना दाणे घालावेत
मीन
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागेल. काही अडचण आल्यास वेगळी विचारसरणी वापरून प्रश्न सोडवावा असा टॅरो चा संदेश आहे. हातातील कामे वेळच्यावेळी पूर्ण करावी अन्यथा नुकसान संभवते. जवळच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतो. स्वत:च्या मताला अवाजवी किंमत देऊ नका. आर्थिक प्रश्न सुटतील.
आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद घालावी
अशोकाच्या झाडाच्या पानांमध्ये उत्कर्षाची चांगली शक्ती असते. आघाडाच्या झाडाच्या रसामध्ये आकर्षणाची शक्य असते. साथ अशोकाच्या पानावरती आघाडाच्या झाडाच्या रसाने आपले नाव लिहून त्याला लाल दोरा बांधून देवघरात ठेवावा. असे प्रत्येक बुधवार करावे.