राजकीय कोलांट्या उड्या मारण्यात केसरकर पटाईत; माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले
सावंतवाडी| प्रतिनिधी
केंद्रात इंडिया आघाडी , राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी खात्री झाल्याने शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली असावी. केसरकर राजकीय कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहेत असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी हाणला. ते म्हणाले,राजन तेली दोन वेळा अपक्ष उभे राहूनही पराभव झाला. अपक्षाला स्थान नाही.मात्र आता केसरकर तुम्हाला कमळ चिन्ह मिळवू देणार नाही. असे भोसले म्हणाले
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आपल्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार राजन तेली यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अँड सायली दुभाषी, सावली पाटकर, बावतीस डिसोजा, आदी उपस्थित होते.