सांगली प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय सचिन खरात गटाचे प्रदेश उपाध्यक्ष टिपूभाई पटवेगार, रीहाना सय्यद, निहाल सय्यद,जाविद जमादार,सणाउला बावस्कर,सर्फराज काझी, संतोष शिंदे, मोशिन शेख, सोनू उतमन, आदित्य चंदनशिवे, राजेश निशाद, साबिल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी, प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस, जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार मिलिंद कांबळे, माजी आमदार मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते तथा राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पनवेल जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, पनवेल महिला निरिक्षक भावनाताई घाणेकर, समन्वयक शेखर माने व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.