कमला नदीवर बांधलेला पूल तुटला
दरभंगा
बिहारमधील दरभंगा जिह्यात सोमवारी आणखी एक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली. बिहारमधील चार जिह्यांतील लोकांची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱया कमला नदीवरील पूल तुटला आहे. या दुर्घटनेमुळे लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. दरभंगा जिह्यातील सोहरवाघाट येथील कमला नदीवर बांधलेला हा पूल सीमावर्ती भागात असून तेथे चार जिल्हे एकत्र येतात. मधुबनी, सहरसा, खगरिया, समस्तीपूर या सुमारे 10 पंचायतींना जोडणारा हा एकमेव पूल असल्यामुळे सदर गावांचा वाहतूक संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या महिन्यातही बिहारमध्ये एक निर्माणाधीन पूल कोसळण्याची दुर्घटना घडली होती.
वाळूने भरलेला ट्रक पुलावरून जात असताना वाहन पुलाच्या मध्यभागी येताच पुलाचे दोन भाग झाले आणि ट्रक पुलावर लटकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 2021 मध्ये स्थानिक लोकांच्या खूप संघर्ष आणि निदर्शनांनंतर जुन्या पुलाच्या ऐवजी नवीन पुलाची पायाभरणी केली होती. हे पूरप्रवण क्षेत्र असल्याने वर्षातील 6 महिने येथे वाहतुकीची साधने बंद असतात किंवा होडी हाच एकमेव आधार राहतो. या भागात कोशी नदी, कमला नदी दरवषी तुडुंब भरल्यामुळेही लोकांना बऱयाच समस्यांचा सामना करावा लागतो.