मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम :पांच दिवसांत 6 हजारांपेक्षा अधिक ऊग्णांनी घेतले उपचार
पणजी : मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा आणि डॉ. मनोज शर्मा यांच्या आयुर्वेद न्युरो हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोटा-राजस्थान याच्या संयुक्त विद्यमाने बेतकी, खांडोळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच मोफत आयुर्वेदिक न्युरो थेरपी वैद्यकीय शिबिराची सांगता आज झाली. 6 हजारांपेक्षा अधिक ऊग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आज शेवटच्या दिवशी सुमारे बारशे ऊग्णांची नोंद झाली. 24 मेपासून सुरू झालेल्या या शिबिराच्या समारोपाला केंद्रीय मंत्री तथा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून तर सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे खास अथिती म्हणून उपस्थित होते. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे हे अशा प्रकारचे आतापर्यंतचे नववे शिबिर असून आतापर्यंत जवळपास 40 ते 45 हजार ऊग्णांनी शिबिरांचा लाभ घेतलेला आहे.
समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या डीन डॉ. सुजाता कदम, डॉ. मनोज शर्मा, डॉ. वेणू शर्मा, सांडू फार्मस्युटिकल्सचे उमेश सांडू, गोवा पर्यटन महामंडळाचे पीआरओ दीपक नार्वेकर, बेतकी आरोग्य केंद्राच्या अधिकारी ब्रँडा पिंटो, उपेंद्र तिंबले, उत्तर गोवा जि. पं. अध्यक्ष सिद्धेश नाईक, भाजपाचे प्रियोळ मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक, बेतकी-खांडोळाचे सरपंच विशांत नाईक, उपसरपंच हर्षा गावडे, तिवरे वरगांवचे सरपंच जयेश नाईक, वेरे-वाघुर्मेच्या सरपंच शोभा पेरणी, बेतकी-खांडोळाच्या उपसरपंच संजीवनी तळेकर, जि. पं. सदस्य श्र्रमेश भोसले, डॉ. गोविंद काळे, शिवा नाईक, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. संगीता किर्लोसकर, डॉ. संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड काळात शिबिराच्या आयोजनात खंड पडला, परंतु यापुढे मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे भरविली जातील. ऊग्ण आपले दुखणे गेले, असे हसून सांगतांना पाहून खूप समाधान वाटते. केलेल्या श्र्रमांचे चिज झाले, याचा आनंद वाटतो, असे केंद्रीय मंत्री तथा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले. श्री. गोविंद गावडे यांनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करताना अशा प्रकारच्या शिबिरांची गरज असल्याचे नमूद केले. डॉ. मनोज शर्मा आणि डॉ. वेणू शर्मा यांचा याप्रसंगी त्यांच्या विशेष योगदानाबद्दल शाल आणि मानचिन्ह देऊन कला आणि सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात अथक परिश्र्रम घेतलेल्या व ऊग्णांची मनोभावे सेवा केलेल्या डॉक्टरांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय हे शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचललेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. आयुर्वेदिक न्युरो हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. मनोज शर्मा यांच्या देखरेखेखाली झालेल्या या शिबिरात फ्रोझन शोल्डर, सर्व्हिकल पेन, बॅक पेन, स्लीप डिस्क, अँकल पेन, मायग्रेन पेन, वोकल कॉर्ड प्रॉब्लेम, पॅरालिसिस, गुडघेदुखी, टेनिस एल्बो आदी न्युरोलॉजिकल समस्यांवर उपचार करण्यात आले. प्रियोळचे मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक यांनी समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले, मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे सचिव सुरज नाईक यांनी यांनी सर्वांचे आभार मानले. प्रसिद्ध सूत्रनिवेदक व नाट्याकलाकार प्रदीप नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.