पोल्ट्री व्यावसायिकांना फटका : बजेटवर परिणाम : व्यवसाय चालविणे झाले कठीण
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून कोंबडय़ांच्या खाद्यदरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. पूर्वी एका कोंबडीला पालनासाठी 70 ते 80 रुपये खर्च येत होता. तो आता 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.
कोंबडय़ांच्या खाद्यात कणकी, मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश केला जातो. मात्र, या खाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे एकूण उत्पादन आणि व्यवस्थापन याचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. गतवषीच्या तुलनेत यंदा खाद्याच्या दरात 30 ते 35 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
जिल्हय़ात साधारण दहा हजारहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. यामध्ये विशेषतः ब्रॉयलर कोंबडय़ांचे उत्पादन होते. या कोंबडय़ांना एनर्जी स्रोत म्हणून मका, बाजरी, सोयाबीन आणि तुकडा तांदूळ दिला जातो.
मात्र, या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे साहजिकच खाद्याच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात सुरुवातीच्या काळात चिकनमुळे कोरोनाचा प्रसार होतो, अशा अफवा जोरकसपणे पसरल्यामुळे चिकन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. दरम्यान, अनेक ठिकाणी कोंबडय़ा टाकण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच कोंबडय़ांच्या खाद्याचे दर वाढत चालल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
18 रु. किलोचा मका झाला 30 रुपये
पोल्ट्री व्यवसायात 70 ते 75 टक्के खर्च हा कोंबडय़ांच्या खाद्य व्यवस्थापनावर केला जातो. खाद्याच्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने एकूणच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
त्यामुळे व्यवसायाचा ताळमेळ बसणे जिकिरीचे बनले आहे. परतीच्या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. एरवी 17 ते 18 रुपयाने किलो मिळणारा मका 30 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अधिक पैसे देऊन खाद्य खरेदी करावे लागत
आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले
थंडी हळूहळू सुरू होत असल्याने चिकन आणि अंडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन येतील, असे वाटत असतानाच कोंबडय़ांच्या खाद्याचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे एकूण व्यवस्थापन खर्च वाढला आहे. चिकनची मागणी वाढत असली तरी दुसरीकडे कोंबडय़ांच्या खाद्याचे दर वाढल्याने एकूण उत्पादन खर्च वाढला आहे.
आधीच महागाईमुळे नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच खाद्याचे दर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अधिकचा खर्च केवळ खाद्यांवर
कोंबडय़ांना खाद्य म्हणून मका, सोया आणि कणकीचा वापर केला जातो. मात्र, कच्च्या मालाचा दर वाढल्याने कोंबडय़ांचे खाद्यदरही वाढले आहेत. त्यामुळे एकूण उत्पादन आणि एकूण खर्च याचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. पोल्ट्रीतील पक्ष्यांना दररोज मोठय़ा प्रमाणात खाद्य द्यावे लागते. अधिकचा खर्च हा केवळ खांद्यावर केला जातो. त्यामुळे फटका बसत आहे.
– एन. के. नलवडे (पोल्ट्री व्यावसायिक, बेळवट्टी)
सध्या पोल्ट्री व्यवसाय सुरळीत
मागील दोन वर्षात कोरोना संकट आणि चुकीच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसला आहे. त्यातच आता खाद्याचे दर वाढल्याने बजेटवर परिणाम होत आहे. बर्ड फ्लूच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्मयात आला होता. मात्र, आता पोल्ट्री व्यवसाय सुरळीत सुरू झाला आहे.
-डॉ. श्रीकांत गावी (साहाय्यक निर्देशक कर्नाटक सहकार कुक्कुटपालन महामंडळ)