वार्ताहर /शिवोली
कोणत्याही ग्राहकावर अन्याय झाला तर ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे दाद मागावी असे आवाहन ग्राहक जागृती कार्यक्रमात करण्यात आले.
ग्राहक जागृती दिनानिमित्त जागो ग्राहक जागो कार्यक्रमाचे आयोजन गिरी पंचायत कार्यालयात झाले. या कार्यक्रमाला प्राध्यापक विजय परब, नागरी पुरवठा खात्याचे -इन्स्पेक्टर भानू गोलतेकर, सबइन्स्पेक्टर वासुदेव शिरोडकर, कर्मचारी अनिशा गोवेकर, विनायक मुळगावकर, तेजा पार्सेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांना अनेक वेळा फसविले जाते. अशा ग्राहकांना ग्राहक काकडे जात मागता येते. अशा प्रकारची तक्रार पर्वरी येथील फोरम कडे नोंद करता येते. जुनता हाऊस येथील नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयातही तक्रार करता येते. ग्राहकांनी अशाप्रकारे तक्रार करून फसवेगिरी ला आळा घालण्यास मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.