अप्रिय घटना वगळता मिरवणूक शांततेत, श्री विसर्जन मिरवणूक 24 तासांची
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक शनिवारी दुपारी संपली असली तरी विसर्जनाची प्रक्रिया सायंकाळी 5.20 वाजेपर्यंत चालली. कपिलेश्वर मंदिराजवळील दोन्ही तलावांजवळ गणेशभक्तांची मोठी गर्दी जमली होती. काही अप्रिय घटना वगळता तब्बल 24 तासांहून अधिककाळ मिरवणूक व विसर्जनाची प्रक्रिया चालली.
शनिवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीवरून कपिलेश्वर मंदिराजवळील जुन्या विसर्जन तलावात 52 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन झाले तर नव्या तलावात शनिवारी सायंकाळपर्यंत 113 श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पेनच्या साहाय्याने मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या दोन्ही तलावांत 165 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली होती. रात्री 8 वाजता कपिलेश्वर तलावात मिरवणुकीतील पहिल्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तर शनिवारी सायंकाळी 5.20 वाजता महानगरपालिकेच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस व मनपा अधिकाऱयांनी तलावाजवळ केलेले नृत्य लक्षवेधी ठरले.
शेवटच्या श्रीमूर्तीच्या विसर्जनापर्यंत दोन्ही तलावांवर गणेशभक्तांची गर्दी जमली होती. तलावाजवळ व रेल्वे ओव्हरब्रिजवर जलद कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. वरि÷ पोलीस अधिकारीही तळ ठोकून होते. फटाके उडविताना दोन भक्तांच्या अंगावर पडून ते किरकोळ भाजल्याची घटना, क्षुल्लक कारणावरून तरुणाईमध्ये झालेली हाणामारी, ठिकठिकाणी पोलिसांचा सौम्य लाठीमार अशा काही घटना वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली.
शनिवारी सकाळी रामलिंगखिंड गल्ली परिसरात व दुपारी कपिलेश्वर उड्डाणपुलावरून उतरताना पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला केला आहे. पाचहून अधिक कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत तर फटाके उडविताना बाळेकुंद्री येथे आनंद गुंडी (वय 21, रा. बाळेकुंद्री) हा तरुण जखमी झाला आहे. जक्कीनहोंडा परिसरात फटाके उडविताना इराप्पा तंगेटप्पगोळ (वय 32) हा युवक जखमी झाला आहे. या दोघा जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
संवेदनशील भागातील श्रीमूर्ती लवकर मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या नाहीत. यासाठी पोलीस दलाने सतत प्रयत्न सुरू ठेवले होते. शनिवारी पहाटे जलद कृती दलाच्या जवानांना पाचारण करून पोलिसांनी कडक बंदोबस्तात येथील श्रीमूर्ती बाहेर काढल्या. डीजेवरून पोलीस अधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वादावादीचेही प्रसंग घडले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजेला बंदी आहे. पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांबरोबर झालेल्या बैठकीनंतर आधी रात्री 12 पर्यंत, नंतर मध्यरात्री 3 पर्यंत दोन टॉप दोन बेस लावण्यास तोंडी परवानगी दिली होती. मात्र काही ठिकाणी पहाट उजाडली तरी श्रीमूर्ती हलविण्यात आली नाही. त्यामुळे डीजे बंद पाडून केवळ श्रीमूर्ती मुख्य मिरवणुकीत आणण्यात आली. यावेळीही कार्यकर्ते व पोलीस अधिकारी यांच्यात वादावादीचा प्रसंग घडला.
डीजेसाठी तर शहर व उपनगरांतील अनेक ठिकाणी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साडेतीन हजारांहून अधिक अधिकारी व पोलिसांनी बंदोबस्तात भाग घेतला होता.
एफआयआर दाखल करण्याची तयारी
डीजेचा वापर, निर्धारित डेसीबलपेक्षा अधिक आवाज, वेळेचे भान न राखणे, वेळोवेळी सल्ला देणाऱया पोलीस अधिकाऱयांबरोबर हुज्जत घालणाऱया वेगवेगळय़ा गणेशोत्सव मंडळांवर एफआयआर दाखल करण्याची तयारी पोलीस दलाने केली आहे. बेळगाव शहर व परिसरात वादावादीचे अनेक प्रसंग घडले आहेत. पोलिसांनी हे प्रकार गांभीर्याने घेतले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री कणबर्गी येथेही पोलीस अधिकाऱयांबरोबर वादावादीची घटना घडली आहे. खासकरून डीजे वापरणाऱयांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची तयारी अधिकाऱयांनी केली आहे.