किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता कमी ः विविध अहवालानुसार आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत बाजारात पुन्हा एकदा कॉटनच्या किमती वाढताना दिसत आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत किमती 8 टक्के इतक्या वाढल्या आहेत. देशात कॉटन उत्पादन क्षेत्रात जोरदार पाऊस आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उत्पादनाचे गणित बिघडले आहे आणि याचा फायदा किमती वाढण्यात झाला आहे.
देशांतर्गत बाजारात लघुअवधीसाठी कॉटनच्या किमती या 45,455 रुपये ते 47,500 रुपयाच्या दरम्यान राहणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये कपातीसोबत किमती हळूहळू कमी होत जात त्या 40,000 रुपयाच्या खाली येण्याची शक्यता आहे. याही पुढे जाऊन किमती अंदाजे 35,000 रुपये प्रति गाठीच्या जवळपास पोहोचणार असल्याची माहिती आहे.
ऑगस्टमध्ये 8 टक्क्यांनी वाढली कॉटनची किमत
ओरिगो ई मार्केटचे सहाय्यक जनरल मॅनेंजर तरुण तत्संगी यांच्या माहितीनुसार देशातील कापसाचे उत्पादन होणाऱया प्रदेशात मोठय़ा प्रमाणात पाऊस आणि किडय़ांमुळे पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे भारतीय बाजारात कॉटनच्या किमतीमध्ये जवळपास 46,000 रुपये प्रति गाठीच्या वर किमती पोहचल्या आहेत.यामुळे आतापर्यंत ऑगस्टमध्ये कॉटनच्या किमतीत जवळपास 8 टक्क्यांची तेजी आली आहे.
कापूस उत्पादनात नुकसान
साधारणपणे अमेरिकेत कापूस पिक नुकसानीत राहिलेले असून भारतीय पिकांचेही आकडे सकारात्मक येण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात कॉटनच्या किमती आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामान्यतः कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण व अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यास कॉटनच्या किमती कमी होतात. पण आता कच्चे तेल व डॉलर यांचा कॉटनच्या दराशी संबंध तुटला असल्याचेही त्यांनी सांगितले.