बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत ‘आम्ही या प्रकरणाची चौकशी करू’ असे स्पष्ट केले आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना गुजरात सरकारने अलीकडेच मुक्त केले होते. गेल्या आठवडय़ात या मुद्दय़ावर बराच गोंधळ झाला होता. आरोपींची सुटका करण्याच्या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. महिलेवर बलात्कार आणि कुटुंबाची हत्या यासारख्या अक्षम्य गुन्हय़ातील दोषींची शिक्षा रद्द करणे चुकीचे आहे, असे मत ज्ये÷ वकील कपिल सिब्बल आणि अपर्णा भट्ट यांनी याचिकेच्या माध्यमातून मांडले आहे.