आचरा येथे स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
आचरा प्रतिनिधी
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचराने क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश ‘ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आचरा गावचे सुपुत्र माजी सैनिक निलेश भोसले आणि सचिन पुजारे यांच्या हस्ते केले गेले. यावेळी या दोन्ही माजी सैनिकांनी सीमेवरील आपले अनुभव कथन केलेत. देशाच्या सीमांचे रक्षण करत असताना देश हेच आपलं कुटुंब हीच मनाची धारणा बनलेली असते. प्रत्येक सैनिक हा देशसेवा हे आपलं आद्य कर्तव्य म्हणून मानून आपली ड्यूटी बजावत असल्याचे ते म्हणालेत.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर सदस्य उर्मिला सांबारी, वैशाली सांबारी, जयप्रकाश परूळेकर,भिकाजी कदम, दिपाली कावले, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,श्रद्धा महाजनी, यांसह कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आचरे गावातील निलेश भोसले व सचिन पुजारे या दोन माजी सैनिकांचा ज्ञानेश्वरी व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी केले.