सभापती रमेश तवडकर यांची प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका : अमूक दिवसांत निवाडा देण्यास सांगू शकत नाही,सभापती हे पद घटनात्मक असल्याचा केला दावा
पणजी ; न्यायमूर्ती बी. पी. देशपांडे व न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर काल शुक्रवारी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेली याचिका सुनावणीस आली असता, उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून सभापती रमेश तवडकर यांनी आपली भूमिका मांडली. सभापती हे घटनात्मक पद असल्याने अपात्रता याचिकेवर अमूक दिवसांत निवाडा द्या, असे निर्देश आपल्याला न्यायालय देऊ शकत नसल्याचा दावा तवडकर यांनी केला. या याचिकेवरील पुढील सुनावणी 10 मार्च रोजी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांविऊद्ध अपात्रता अर्जावर 90 दिवसांमध्ये निवाडा देण्याचे आदेश सभापती रमेश तडवकर यांना न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर काल ही सुनावणी झाली.
सभापतींसमोर चार याचिका
सभापती रमेश तवडकर यांच्याकडे चार याचिका आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे अमित पाटकर यांनी जुलै 2022 मध्ये सादर केलेली याचिका, अमित पाटकर व डॉम्निक नोरोन्हा यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी दाखल केलेल्या दोन याचिका, आणि 13 नोव्हेंबर 2022 रोजी गिरीश चोडणकर यांनी सादर केलेली याचिका आहे. त्यापैकी पाटकर व नोरोन्हा यांच्या याचिकेवरील सुनावणी सुरू असून त्यावरील पुढील सुनवाणी 5 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
सभापतींकडून मुद्दामहून उशीर
सभापतींसमोर असलेल्या अपात्रता याचिकांवर निवाडा देण्यास मुद्दामहून उशीर केला जातो, याचा अनुभव येत आहे, असे गिरीश चोडणकर यांचे म्हणणे असून त्याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
चोडणकर यांची याचिका
फुटीर आमदारांच्या विरोधात गिरीश चोडणकर यांनी दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजी सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यात सदर प्रकार म्हणजे घटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा भंग असल्याचे म्हटले होते. तसेच या याचिकेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणी मांडलेल्या उदाहरणाकडेही लक्ष वेधले होते. तेथे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने, सदर प्रकरणाच्या सुनावणीला अवास्तव विलंब झाल्यामुळे अपात्रता याचिकांना सामोरे जावे लागलेले सदस्य अधिकृत पदावर राहू शकत नाहीत, असे म्हटले होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटवफर यांनी आमदार मायकल लोबो व दिगंबर कामत यांच्याविऊद्ध दाखल केलेली अपात्र याचिकेवरील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे.
काँग्रेसचे फुटलेले आमदार
- दिगंबर कामत
- मायकल लोबो
- दिलायला लोबो
- ऊडॉल्फ फर्नांडिस
- राजेश फळदेसाई
- संकल्प आमोणकर
- केदार नाईक
- आलेक्स सिक्वेरा