अभिनेत्रीसोबत विवाह करण्याची शक्यता
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हे विभक्त झाले आहेत. अशा स्थितीत नागा हे लवकरच दुसरा विवाह करणार असल्याची चर्चा आहे. नागा चैतन्य आणि अभिनेत्री दिव्यांशा कौशिक यांचे डेटिंग सुरू असल्याचे बोलले जात आहे. परंतु अद्याप याची जाहीर कबुली देण्यात आलेली नाही. दिव्यांशासोबत नागा चैतन्य विवाह करू शकतात असे मानले जात आहे. नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या ‘मजिली’ या चित्रपटात दिव्यांशानेही महत्त्वाची भूमिका साकारली होती. नागार्जुन यांनी नागा चैतन्यचे दुसऱया विवाहासाठी मन वळविल्याचे सांगण्यात येते.
सोशल मीडियावर दोघांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. नागा चैतन्य लवकरच ‘थँक यू’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर त्याचा पहिला हिंदी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ देखील प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यात तो आमिर खान आणि करिना कपूरसोबत दिसून येणार आहे.