कसबा बीड /प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथील बाळासो शंकर फाटक (वय 52) राहणार कोगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार बाळासो शंकर फाटक हे एकटेच राहत होते. त्यामुळे ते काल सायंकाळी चार वाजल्यापासून घरी आले नव्हते. त्यांची मुलगी गावातच असल्यामुळे मयत बाळासो फाटक त्यांच्या बाबत चौकशी केली असता ते झोपी गेले आहेत, असा सर्वांचा समज झाला होता. पण त्यांचा पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सीपीआर येथे हलवण्यात आला. त्यामध्ये त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार विजय गुरव करत आहेत.