नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री उशिरा 12 वाजण्याच्या सुमारासह कॉल करून ही धमकी देण्यात आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करत काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव जयप्रकाश असून तो मनोविकारांनी पीडित असल्याचे सांगितले जात आहे.