दिल्लीतील निवासस्थानी फोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी नितीन गडकरी यांना नागपुरात फोन करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. बेळगावमधील हिंडलगा कारागृहातून ही धमकी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता नव्याने मिळालेली धमकी कोणी व कोठून दिली, याबाबत उलगडा करण्यात आलेला नाही. दिल्ली पोलीस इतर यंत्रणांच्या सहकार्याने याबाबत अधिक तपास करत आहेत.