ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीच्या बाह्य जिल्हा पोलिसांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
दिल्लीच्या बाह्य जिल्हा पोलिसांना पीसीआरवर दोन फोन आले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या फोननंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हालवत धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात केले.
Delhi | The man who made threatening calls to kill the Prime Minister, Union Home Minister and Bihar CM has been identified as Sudheer Sharma, a resident of Madipur. The accused's family says that he is a habitual drinker. The police are trying to locate him: Police
— ANI (@ANI) June 21, 2023
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे पथक फोन करणाऱ्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहचले. सुधीर शर्मा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो मदिपूरचा रहिवाशी आहे. त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता सुधीर याने दारुच्या नशेत हे कृत्य केले असून, तो रात्रीपासून गायब असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करु, असे पोलिसांनी सांगितले.