वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने आपल्या आर्थिक वर्ष 2024 मधील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून एप्रिल ते जून 2023 कालावधीत कंपनीने 16 हजार 11 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 17 हजार 955 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. याचाच अर्थ जून 2023 च्या तिमाही नफ्यात 11 टक्के घट नोंदली गेली आहे.
लाभांश जाहीर
कंपनीने निकालानंतर आपल्या गुंतवणूकदारांना 9 रुपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे. मागच्या तिमाहीत कंपनीने 19 हजार 299 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. दुसरीकडे पहिल्या तिमाहीत कंपनीने 2.07 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलाय. मागच्या वर्षी याच अवधीत तो 2.19 लाख कोटी रुपये इतका होता.
जियोचा नफा वाढला
पहिल्या तिमाहीत टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी जियोचा निव्वळ नफा 12 टक्के वाढीसह 4863 कोटी रुपये राहिला होता. मागच्या खेपेला याच अवधीत 4335 कोटी रुपये नफा प्राप्त केला होता.