वृत्तसंस्था/ डब्लीन (आयर्लंड)
ऑस्ट्रेलिया, पाक आणि यजमान आयर्लंड यांच्यात आयर्लंडमध्ये होणाऱया महिलांच्या आगामी तिरंगी मालिकेसाठी आयर्लंडचा संघ जाहीर करण्यात आला होता. कर्णधार लॉरा डिलेनीचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी आयर्लंड संघामध्ये अनेक खेळाडूंचा पुन्हा सहभाग झाला आहे.
दुखापतीमुळे आयर्लंडची कर्णधार लॉरा डिलेनीला दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेत सहभागी होता आले नाही. या आगामी तिरंगी मालिकेसाठी क्रिकेट आयर्लंडने 14 जणांचा संघ जाहीर केला असून सलामीची वेगवान गोलंदाज स्टोकेल आणि प्रेंडरगेस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. ही तिरंगी टी-20 मालिका 16 ते 24 जुलै दरम्यान ब्रॅडी येथे खेळविली जाणार असून आयर्लंडचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर 17 जुलैला होणार आहे.
आयर्लंड संघ- लॉरा डिलेनी (कर्णधार), केनिंग, रॅचेल डिलेनी, डिंपेसी, हंटर, कॅवेनगे, केली, लेवीस, मॅकमोहन, मॅग्युरी, केरा मरे, पॉल, प्रेंडरगेस्ट, स्टोकेल.