सामाजिक समानता जोपासण्याचा अनोखा प्रयत्न
धामोड / वार्ताहर
ध्वजारोहण समारंभ समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या, मान्यवरांच्या हस्ते संपन्न होण्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र याला फाटा देत समाजातील वंचित घटकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न करण्याची परंपरा धामोड ( ता. राधानगरी ) येथील लोकनेते आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालयाच्यावतीने अखंडीत सुरू ठेवली आहे .
प्रशालेने यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक , माजी सैनिक , विधवा महिला, ग्रामपंचायतचे स्वच्छता दूत, आदर्श विद्यार्थी अशा घटकांना संधी देऊन ध्वजारोहन केले आहे. गुरुवारी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन वास्तुशास्त्र तज्ञ, विधिसेवा विभागाचे कार्यकर्ते, तृतीयपंथी plv स्मिता शाम वदन यांच्या हस्ते करून सामाजिक समानता जोपासली आहे . हा उपक्रम जिल्हा विधिसेवाचे सचिव प्रितम पाटील यांच्या सूचकतेवरून अॅडव्होकेट शिवा नवणे यांच्या प्रयत्नातून राबवण्यात आला . अशा या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे . प्रारंभी शाळेच्यावतीने देशभक्तीपर गीते , कवायत संचलन , लाठी- काठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले .यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे , संस्थाचेअरमन दिपसिंह नवणे , सरपंच सौ . रेश्मा नवणे , माजी सरपंच प्रमिला नवणे , भानोबा सेवा संस्थेचे चेअरमन माधव नवणे , भगतसिंग नवणे , वैष्णवी नवणे , व्ही .डी चौगले , किसन पोतदार , डी.जी. नलवडे , महादेव फडके , रघूनाथ धनवडे ,सदाशिव कोरे ,नामदेव सुतार , विष्णू पाटील ( गुरुजी ) , सुभाष गुरव, प्रशांत पोतदार , सुभाष सुतार , अमोल आडके , हरी पाटील आदीसह विद्यार्थी , ग्रामस्थ उपस्थित होते .