प्रतिनिधी/बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाववतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व विभागप्रमुख गजानन निलजकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून ध्येयमंत्राने सांगता करण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, शंकर भातकांडे, शिवाजी मंडोळकर, गजानन पवार, विजय कुंटे, गिरीश पाटील, कुरणे काका, युवराज पाटील, अभिषेक निलजकर, परशराम कुंडेकर, उदित रेगे, अभिजित अष्टेकर, मारुती पाटील, संकेत सुतार, शुभम मोरे, रमेश चौगुले, नितीन कुलकर्णी व शिवभक्त उपस्थित होते.