केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांची घोषणा : डिजिटायझेशनच्या राष्ट्रीय मोहिमेचा गोव्यातून शुभारंभ
पणजी : देशातील संपूर्ण जैवविविधता नोंदणींचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केली. जैवविविधता नोंदणीपुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणीसाठी राष्ट्रीय मोहिमेचा गोव्यातून शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य जैवविविधता मंडळ, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यावरण आणि हवामान बदलमंत्री नीलेश काब्राल, प्राधिकरणाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. अचलेंदर रे•ाr आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना चौबे यांनी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन ही गुऊकिल्ली आहे. हा समतोल राखणे महत्त्वाचे असून एखाद्याने निसर्गाकडून जेवढे घेतले तेवढे परत केले पाहिजे, असे सांगितले. पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्ट्रारद्वारे जैवविविधतेची नोंद केल्याने आम्हाला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यास मदत होईल. आम्ही लवकरच या जैवविविधता नोंदणीचे इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांमध्ये रूपांतर करत आहोत, असे ते पुढे म्हणाले.
जैवविविधता जपण्यात स्थानिकांचा सहभाग उल्लेखनीय : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना, या राष्ट्रीय मोहिमेच्या शुभारंभासाठी गोव्याची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच जैवविविधता जपण्यासाठी गोव्यातील लोकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांचा उल्लेख केला. त्याचबरोबर या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्थानिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या क्षेत्रातील गोव्याचे यश हे प्रत्येक गोमंतकीयाच्या श्रमांचे यश आहे. जैवविविधता जतन करण्याच्या प्रयत्नात सरकार स्थानिक नागरिकांना केवळ साहाय्य करू शकते आणि म्हणूनच प्रत्येक यश हे संपूर्ण समाजाचे आहे, असे ते म्हणाले.
दोन पुस्तकांचे प्रकाशन
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘जैवविविधता हेरिटेज साइट्स ऑफ इंडिया’ आणि ‘अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड मॅनेजमेंट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्वोत्कृष्ट जैवविविधता व्यवस्थापन समितीना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच हरित पत्रकार पुरस्कार आणि जैवविविधता जतन करण्यासाठी वैयक्तिक योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.