कणकुंबी : लोककल्प फौंडेशनवतीने कणकुंबी भागातील 32 गावे दत्तक योजनेखाली घेण्यात आलेली आहेत.या सर्व गावांतील शाळांना पहिल्या टप्प्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात कणकुंबी भागातील चोर्ला, माण, चिगुळे, चिखले, पारवाड व बेटणे या सहा शाळांना खेळाचे साहित्य व पाण्याचे फिल्टर देण्यात आले.
यावेळी चोर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका सुचिता माळवी व सहशिक्षिका मीना बन्सूर, चिगुळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोरल, चिखलेचे मुख्याध्यापक एस. एम. मुल्ला, शिक्षिका विद्या कुंडेकर, सहशिक्षक पी. एस. चव्हाण तसेच पारवाड शाळेच्या मुख्याध्यापिका कारेकर, आनंदा हंगिरकर, माण शाळेचे अतिथी शिक्षक गावकर व बेटणे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी मॅडम यांनी लोककल्प फाऊंडेशनच्या या देणगीचा स्वीकार केला. यावेळी लोककल्प फौंडेशनचे कार्यकर्ते संतोष कदम, प्रितेश पोतेकर व सूरजसिंग राजपूत उपस्थित होते. लोकमान्य लोककल्प फौंडेशनचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे भागातील शिक्षक व शिक्षणप्रेमींतून कौतुक होत आहे.