शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थिनींना अर्थसाहाय्य
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील मलाबार गोल्ड, डायमंडअंतर्गत मलाबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 89 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम शनिवारी भाग्यनगर येथील सीटी हॉलमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, व्यासपीठावर टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल देव गडाद, प्रा. व्ही. वाय. वण्णूर आदी उपस्थित होते.
यावेळी लिलावती हिरेमठ म्हणाल्या, प्रत्येक संस्था आणि संघ समाजाच्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहे. त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू लागले आहे.
महिला सबलीकरणाबरोबर गरीब-होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 8 लाख 90 हजार रूपये शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. जिल्ह्यातील विविध कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थिनींची निवड करून त्यांना प्रत्येकी 10 हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. याप्रसंगी मलाबार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.