मालवण ; प्रतिनिधी
श्री. रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने ओझर विद्या मंदिर, कांदळगावच्या सर्व ६० विद्यार्थ्यांना आज सोमवार, दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी मोफत शालेय गणवेश वितरित करण्यात आले. मंडळाने हे शालेय गणवेष टाय आणि बेल्टसह प्रदान केले आहेत. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. संतोष परब, तसेच खजिनदार श्री. मधुसुदन परब, विश्वस्त श्री. संजय परब, श्री.बाबाजी परब, श्री. महादेव परब, श्री. प्रभाकर कांदळगावकर आणि श्री. सदानंद कदम इत्यादी मान्यवर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेचे मुख्याध्यापक, श्री. दीपक जाधव यांनी सर्व विश्वस्तांचे स्वागत केले. यानिमित्त विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. संतोष नारायण परब यांचा शाळेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.