क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 17 वी जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी मोठ्या उत्साहात पार पडली. शिवगंगा स्पोर्ट्स अकादमी ओमनगर स्केटिंग रिंक येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी या निवड चाचणी व स्पर्धेमध्ये भाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 5 ते 7 वर्ष गट : दियान पोरवाल 1 सुवर्ण व 1 रौप्य, शिवाय पाटील 1 सुवर्ण व 1 रौप्य, साईराज यादव 1 सुवर्ण व 1 कांस्य, अनमोल चोगुले 1 रौप्य व 1 कांस्य, श्लोक भोजनावर 1 कांस्य. 7 ते 9 वर्षांची मुले अवदूत मोरे 3 सुवर्ण, सार्थक चव्हाण 1 सुवर्ण व 1 रौप्य, 1 कांस्य, समीध कणगली 2 रौप्य व 1 कांस्य, रुहान मद्दे 1 रौप्य व 1 कांस्य, जगदीश पांडियन 1 कांस्य. 7 ते 9 वयोगटातील मुली : दुर्वा पाटील 3 सुवर्ण, स्वरा सामंत 1 सुवर्ण व 2 रौप्य, लावण्या लोहार 2 रौप्य व 1 कांस्य, देशना चप्परबंडी 2 कांस्य, द्रिती वेसणे 1 कांस्य.
9 ते 11 वर्षे मुले : कुलदीप बिर्जे 3 सुवर्ण, सर्वेश पाटील 1 सुवर्ण व 2 रौप्य
श्रेयश बलोल 1 रौप्य व 2 कांस्य, पार्थ कल्कुटकी 1 कांस्य. 9 ते 11 वयोगटातील मुली : प्रांजल पाटील 3 सुवर्ण, आरोही महारनूर 1 सुवर्ण व 2 रौप्य, प्रिशा चप्परबंडी 2 रौप्य, रुत्रा दळवी 3 कांस्य. 11 ते 14 वर्षे मुले : सौरभ साळुंखे 3 सुवर्ण, सत्यम पाटील 1 सुवर्ण व 2 रौप्य, भव्य पाटील 2 रौप्य व 1 कांस्य, रुत्विक दुब्बाशी 2 कांस्य, आदर्श नाईक 1 कांस्य. 11 ते 14 वयोगटातील मुली : जान्हवी तेंडुलकर 3 सुवर्ण, अनघा जोशी 1 सुवर्ण व 2 रौप्य, प्रकृती पोळ 1 रौप्य व 2 कांस्य, रचना रायकर 2 कांस्य, सिद्दमा होनकल 1 रौप्य. 14 ते 17 वर्षे मुले : श्री रोकडे 3 सुवर्ण, शल्य तालुकार 1 सुवर्ण व 2 रौप्य, रितेश दो•मणी 1 रौप्य व 2 कांस्य.
14 ते 17 वयोगटातील मुली : सानवी इटगीकर 3 सुवर्ण, 17 वर्षांवरील महिला : विशाखा फुलवाले 3 सुवर्ण, शर्वरी साळोखे 3 रौप्य, विशेष बालक : सई पाटील 2 सुवर्ण. इनलाइन स्केटिंग 5 ते 7 वर्षांची मुले : विश्वतेज पोवार 2 सुवर्ण, मुली : कियारा जाधव 2 सुवर्ण, लावण्य जक्कनवर 1 सुवर्ण व 1 रौप्य. 7 ते 9 वर्षांची मुले : भागराज पाटील 3 सुवर्ण, क्रिशराज पाटील 1 सुवर्ण व 1 रौप्य 1 कांस्य, शिवबा लांडगी 2 रौप्य व 1 कांस्य, अद्वैत शेट्टी 1 रौप्य व 1 कांस्य, 7 ते 9 वयोगटातील मुली: अमिषा वेर्णेकर 3 सुवर्ण, भावना पाटील 2 रौप्य, ओवी पाटील 3 कांस्य, आराध्या बामनगोळ 1 सुवर्ण व 2 रौप्य, 9 ते 11 वर्षे मुले: अवनीश कामन्नवर 3 सुवर्ण, विहान कणगली 1 सुवर्ण व 2 रौप्य, अर्शान माडीवाले 2 रौप्य व 1 कांस्य, आदर्श नाईक 2 कांस्यपदक, रुद्र तोरस्कर 1 कांस्य. 9 ते 11 वयोगटातील मुली : राही नीलाज 3 सुवर्ण, सुकन्या कुपानी 1 सुवर्ण व 2 रौप्य. 11 ते 14 वर्षे मुले: अवनीश बेनवडे 3 सुवर्ण, आयुष पाटील 1 सुवर्ण व 2 रौप्य, पंकज कुपाणी 2 रौप्य व 1 कांस्य, सोमेश कमर 2 कांस्य, अदवीक पाटील 1 कांस्य.
11 ते 14 वयोगटातील मुली: सई शिंदे 3 सुवर्ण, अन्वी सोनार 2 सुवर्ण व 1 रौप्य, कामाक्षी वीर 1 रौप्य व 2 कांस्य, प्रतिभा बालाजी 2 रौप्य. 14 ते 17 वर्षे मुले: आरुष दीक्षित 4 सुवर्ण, मुली-करुणा वाघेला 4 सुवर्ण, अमृता हिरेमठ 4 रौप्य 17 वर्षांवरील गट : विनायक पाटील 4 सुवर्ण पटकाविले. बक्षीस वितरण ज्योती चिंडक, आंतरराष्ट्रीय स्केटर निखिल चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर, तुकाराम पाटील, सुरज शिंदे, अजित शिलेदार, विनायक पाटील, स्केटर्स व पालक उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, अजित शिलेदार, तुकाराम पाटील, माडीवाले, सोहम हिंडलगेकर यानी परिश्रम घेतले.