सदाशिवनगर परिसरात कुत्र्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे.
सद्या शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सदाशिवनगर २- मेन सहावा क्रॉस, येथे आज शनिवारी सायं. 5.30 च्या दरम्यान ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर गल्लीतील भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
धनिषा पुंडलिक पाटील असे त्या जखमी मुलीचे नाव आहे.
आज सायंकाळच्या सुमारास ती मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना अचानक एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.
जखमी मुलीला त्वरित स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत
सदाशिव नगर परिसरात अनेक भटकी कुत्री आहेत. ही कुत्री आजपर्यँत अनेकांचा चावा घेतले आहेत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगर पालिका त्वरित कारवाई न केल्यास, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा परिसरातील नागरिकांनी केला आहे.