वाकरे।प्रतिनिधी
Kolhapur News : अयोध्या कॉलनी ,रिंगरोड, फुलेवाडी, कोल्हापूर येथील अवघ्या १० महिन्याच्या सर्विल मंगेश पाटील (गुरव) या बाळाला ज्ञानेश्वरी हातात घेऊन वाचनाचा मोह आवरला नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे मानवी जीवनाचे सार आहे. शेकडो वर्षे या ग्रंथाने वारकरी संप्रदायाला मोहिनी घातलेली आहे. हा ग्रंथ म्हणजे अवघ्या वैष्णवांचा आत्मा आहे.
गेल्या अनेक पिढ्यापासून ज्ञानेश्वरीने सर्वांना जगण्याचा मूलमंत्र देण्याचे महान कार्य केले आहे.आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण येते. मात्र अवघ्या १० महिने वयाच्या सर्विलला ज्ञानेश्वरी ग्रंथ हातात घेऊन वाचण्याचा मोह आवरला नाही.या बालकाला ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे कळत नसले तरी त्याला या ग्रंथाची मोहिनी पडावी ही या ज्ञानेश्वरीची कृपा आहे यादव महाराज मठ,साकोली कॉर्नर येथे त्याने हा प्रयत्न केला.