Do not get involved in any false work; eat Newly elected sarpanch of Rauta, earwigs to the members
तुम्हाला गावातील जनतेने गावच्या विकासासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्ही गावचा विकास प्रामाणिक आणि पारदर्शकतेपणे करा . भाऊसाहेब म्हणजेच ग्रामसेवक अथवा कोणीही राजकीय पुढारी तुम्हाला फाईलवर अथवा विकास कामाच्या धनादेशावर सही करायला लावतील . त्यावेळी त्या फाईलचा पूर्ण अभ्यास करा आणि तात्काळ कुठल्याही फाईलवर अथवा चेकवर सही करू नका . शासनाच्या योजनांचा लाभ तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांना नातेवाईकांना परस्पर देऊ नका . पूर्णपणे ग्रामपंचायत पूर्ण काम करा कुठल्याही खोट्या नाट्या कामात अडकू नका . असा सबुरीचा सल्ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांना दिला आणि एक प्रकारे थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सर्व सरपंचांना कुठल्याही कामात अडकू नका आणि पाच वर्षात चांगली सेवा करा असा संदेश वजा कान पिचक्याही दिल्यात . कुणीही विरोधात तुम्हाला कुठल्याही खोट्या कामात अडकू शकतात त्यामुळे कागदावर सही करताना सावध राहा असा समोरीचा सल्लाही त्यांनी दिला.
सावंतवाडी / प्रतिनिधी